मराठी दलित आत्मकथन साहित्य : उपेक्षित जीवनानुभवांचा वेध
Keywords:
दलित साहित्य, आत्मकथन, जातिव्यवस्था, उपेक्षा, अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार, आंबेडकरी विचार, दलित स्त्री, शिक्षण, सामाजिक परिवर्तन.Abstract
मराठी दलित आत्मकथन साहित्याने मराठी वाङ्मयाला केवळ नवीन अनुभवविश्व दिले नाही, तर भारतीय समाजातील जातिव्यवस्था, अस्पृश्यता, दारिद्र्य, भूक, श्रम, सामाजिक बहिष्कार, स्त्रियांचे दुहेरी शोषण आणि मानवी प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष यांचे वास्तवही प्रभावीपणे समोर आणले. मुख्य प्रवाहातील साहित्याच्या केंद्रापासून दीर्घकाळ दूर राहिलेल्या समाजघटकांनी आत्मकथनाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाचा अर्थ स्वतःच सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे दलित आत्मकथन हे केवळ एका व्यक्तीचे जीवनचरित्र न राहता एका समाजाच्या सामूहिक स्मृतीचे आणि सामाजिक इतिहासाचे दस्तऐवज बनले. ‘बलुतं’, ‘उपरा’, ‘अक्करमाशी’, ‘उचल्या’, ‘माज्या जल्माची चित्तरकथा’, ‘जिणं आमुचं’, ‘आयदान’ आणि ‘कोल्हाट्याचं पोर’ यांसारख्या आत्मकथनांतून जात, वर्ग, लिंग, भटक्या-विमुक्तांचे जीवन, शिक्षणाची आकांक्षा आणि सामाजिक परिवर्तन यांचे विविध पैलू स्पष्ट होतात. प्रस्तुत शोध निबंधात या साहित्याचे समाजशास्त्रीय दृष्टीने विश्लेषण करून उपेक्षित अनुभवांचे सामाजिक अर्थ, आत्मभान आणि प्रतिकाराची प्रक्रिया स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
References
Bhongle Rangrao, “Dalit Autobiographies: An Unknown Facet of Social Reality.” Indian Literature, Vol. 46, No. 4 (210), Sahitya Akademi, New Delhi, July–August 2002, Page No. 158–160.
पवार दया, बलुतं, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, 1978, पृ. क्र. 203.
माने लक्ष्मण, उपरा, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, 1980, पृ. क्र. 156.
Goswami, Lalita. “Of an Autobiography in Marathi: The Anguish of a Dalit: A Study of Lakshman Mane’s Upara.” Indian Literature, Vol. 31, No. 2. Sahitya Akademi, New Delhi, 1988, Page No. 138.
लिंबाळे शरणकुमार, अक्करमाशी, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे, 1984, पृ. क्र. 118.
गायकवाड लक्ष्मण, उचल्या, साकेत प्रकाशन प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर, 2018, पृ.क्र. 216.
कांबळे शांताबाई कृष्णाजी, माज्या जल्माची चित्तरकथा, सुगावा प्रकाशन, पुणे, चौथी आवृत्ती, 2009, पृ.क्र. 150.
Kamble Baby. The Prisons We Broke. Translated by Maya Pandit. Hyderabad : Orient BlackSwan, 2nd ed., 2018, Page No. 200
पवार ऊर्मिला,आयदान, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, 2003, पृ.क्र. 271.
काळे किशोर शांताबाई, कोल्हाट्याचं पोर, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, 1994, पृ.क्र. 116.
Limbale Sharankumar, Towards an Aesthetic of Dalit Literature: History, Controversies, and Considerations. Translated by Alok Mukherjee, Orient Longman, New Delhi, 2004, Page No. 176
Queen, Christopher. “Reading Dalit Autobiographies in English: A Top Ten List.” CASTE: A Global Journal on Social Exclusion, Vol. 2, No. 2. Waltham, Massachusetts : Brandeis University, 2021, Page No. 281
Downloads
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2026 Kavya Setu

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.