माध्यमिक स्तरावरील एकलशिक्षण शाळेतील मुलींच्या स्व-संकल्पना व शैक्षणिक संपादणुकीचा अभ्यास
Keywords:
स्व-संकल्पना, शैक्षणिक संपादणूक, एकलशिक्षण शाळा, माध्यमिक शिक्षण, सहसंबंध, विद्यार्थिनी.Abstract
प्रस्तुत संशोधनाचा मुख्य उद्देश माध्यमिक स्तरावरील एकलशिक्षण शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींची स्व-संकल्पना व शैक्षणिक संपादणूक यांचा अभ्यास करणे आणि या दोन्ही चलांमधील सहसंबंधाचे स्वरूप निश्चित करणे हा आहे. विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये स्व-संकल्पना महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्वतःच्या क्षमता, गुणवैशिष्ट्ये, मर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि सामाजिक स्थान यांविषयी विद्यार्थिनींच्या मनात निर्माण होणारी धारणा म्हणजे स्व-संकल्पना होय. सकारात्मक स्व-संकल्पना विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासाशी, अध्ययनविषयक प्रेरणेशी आणि शैक्षणिक सहभागाशी संबंधित असू शकते. त्याचप्रमाणे शैक्षणिक संपादणूक विद्यार्थिनींच्या अध्ययनातील प्रगती दर्शविणारा महत्त्वाचा घटक आहे. प्रस्तुत संशोधनासाठी सहसंबंधात्मक संशोधन पद्धतीचा आधार घेण्यात आला आहे. संशोधनाचा न्यादर्श म्हणून एकलशिक्षण शाळेतील इयत्ता नववीच्या 60 विद्यार्थिनींचा विचार करण्यात आला आहे. स्व-संकल्पनेच्या मापनासाठी आयेशा खातून व गुंजन दुबे यांची स्व-संकल्पना मापनश्रेणी आणि शैक्षणिक संपादणुकीसाठी इयत्ता आठवीच्या वार्षिक परीक्षेतील गुण विचारात घेण्यात आले आहेत. सांख्यिकीय विश्लेषणासाठी मध्यमान, प्रमाण विचलन, पिअर्सन सहसंबंध गुणांक व t-चाचणी यांचा वापर करण्यात आला आहे. आकडेवारीत स्व-संकल्पना व शैक्षणिक संपादणूक यांच्यात धनात्मक सहसंबंध दिसून येतो. या अभ्यासातून विद्यार्थिनींच्या स्व-संकल्पनेचे शैक्षणिक प्रगतीशी असलेले नाते समजून घेण्यास मदत होऊ शकते.
References
काळे, प्रेमला. (1977). बाल मानसशास्त्र. पुणे : श्रीविद्या प्रकाशन.
खारात, आ. पा. (1974). प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र. पुणे : श्रीविद्या प्रकाशन.
घाटोळे, रा. ना. (2009). सामाजिक मानसशास्त्र. नागपूर : मंगेश प्रकाशन.
जगताप, ह. ना. (2022). शैक्षणिक मानसशास्त्र. पुणे : नरेंद्र प्रकाशन.
दांडेकर, वा. ना. (1970). प्रायोगिक व शैक्षणिक मानसशास्त्र. कोल्हापूर : मोघे प्रकाशन.
देशपांडे, सिन्हा रॉय व वैद्य. (2002). सामाजिक मानसशास्त्र : भाग 1 व 2. पुणे : उमा प्रकाशन.
पलसाने, म. न. व तळवलकर, विद्या. (2000). सामाजिक मानसशास्त्र. पुणे : कॉन्टिनेन्टल प्रकाशन.
पारसनीस, न. रा. (1987). प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र. पुणे : नूतन प्रकाशन.
बर्वे, बी. एन. (2016). व्यक्तिमत्त्व सिद्धांत. नागपूर : विद्या प्रकाशन.
मुंडडा, निशा दिलीप. (2014). प्रगत सामाजिक मानसशास्त्र. जळगाव : अथर्व पब्लिकेशन.
लमाणे, सी. पी., जाधव, एस. व्ही. व सोनटक्के, जयश्री. (2014). प्रगत सामाजिक मानसशास्त्र. जळगाव : प्रशांत पब्लिकेशन.
हरकरे, अनुराधा प्रशांत. (2011). सामाजिक मानसशास्त्राची ओळख. पुणे : निराली प्रकाशन.
Downloads
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2026 Kavya Setu

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.