माध्यमिक स्तरावरील कुमारवयीन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक संपादणूक यांचा सहसंबंधात्मक अभ्यास
Keywords:
आत्मविश्वास, शैक्षणिक संपादणूक, कुमारवयीन विद्यार्थी, माध्यमिक स्तर, सहसंबंधात्मक अभ्यास, सर्वेक्षण पद्धती, शैक्षणिक प्रगतीAbstract
प्रस्तुत संशोधनाचा मुख्य उद्देश छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माध्यमिक स्तरावरील कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि शैक्षणिक संपादणूक यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास करणे हा आहे. कुमारवय हा विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचा अत्यंत संवेदनशील टप्पा मानला जातो. या वयात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास त्यांच्या अध्ययनवृत्ती, वर्गातील सहभाग, निर्णयक्षमता, उद्दिष्टपूर्तीची तयारी आणि परीक्षेतील कामगिरी यावर प्रभाव टाकतो. प्रस्तुत संशोधनासाठी वर्णनात्मक सहसंबंधात्मक सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या अभ्यासासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेतील 100 कुमारवयीन विद्यार्थ्यांचा नमुना निवडण्यात आला. माहिती संकलनासाठी स्वरचित आत्मविश्वास प्रश्नावली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांच्या नोंदी वापरण्यात आल्या. माहितीचे विश्लेषण माध्य, प्रमाणित विचलन, टक्केवारी आणि सहसंबंध गुणांक यांच्या साहाय्याने करण्यात आले. निष्कर्षांनुसार विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि शैक्षणिक संपादणूक यांच्यात सकारात्मक सहसंबंध आढळून आला. यावरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शैक्षणिक, कौटुंबिक आणि समुपदेशनात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.
References
कऱ्हाडे, बी. एम. (2007). शास्त्रीय संशोधन पद्धती. नागपूर: पिंपळापुरे प्रकाशन.
कुमार, र. (2017). संशोधन पद्धती. नवी दिल्ली: सेज पब्लिकेशन.
खातुन, जे. (2007). उच्च व भिन्न शैक्षणिक संपादणूक असलेल्या कुमारामधील व्यक्तिमत्व घटकांच्या संबंधाचा अभ्यास (Ph.D. thesis). एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई.
गुप्ता, रेणू. (2017). शिक्षित-अशिक्षित परिवारो के विद्यार्थियो के समायोजन एवं शैक्षिक उपलब्धी का तुलनात्मक अध्ययन (Ph.D. thesis). पॅसिफिक युनिव्हर्सिटी, उदयपूर.
गुप्ते, उ. (2014). सुबोध संख्याशास्त्र. पुणे: ढवळे प्रकाशन.
घोरमोडे, के. यु., व घोरमोडे, क. (2008). शैक्षणिक संशोधनाची मूलतत्त्वे. नागपूर: विद्या प्रकाशन.
चित्ते, हे. (2015). शैक्षणिक संशोधन: मांडणी व दिशा. नाशिक: सात्विक प्रकाशन.
जयश्री, राणी. (2015). निलगिरी जिल्ह्यातील हायस्कूल स्तरावरील आदिवासी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक संपादणूक यांचा सहसंबंधात्मक अभ्यास (Ph.D. thesis). तमिळ विद्यापीठ, तंजावर.
जहाँ, क्यू. (2005). उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञान, कला आणि वाणिज्य या शाखेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा आलेख आणि त्यांचे शैक्षणिक संपादन यातील संबंधाचा अभ्यास (Ph.D. thesis). अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, अलिगढ.
Fatima, F. (2017). A study of academic achievement of adolescents in relation to their anxiety and self-confidence (Ph.D. thesis). Integral University, Lucknow.
Gakhar, M. (2007). Academic achievement of bachelor of physiotherapy students in relation of their preferred learning and thinking styles. Journal of Educational Research and Extension, 44(1).
Gautam, P., & Swati. (2008). Academic achievement of high school students in relation to test anxiety and level of aspiration. Indian Psychological Review, 70(3).
Gupta, B. V. (2013). Construction and standardization of self-confidence scale of teachers: A study (Ph.D. thesis). Shri J. J. T. University, Jhunjhunu.
Downloads
Published
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2025 Kavya Setu

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.