मराठी भक्ती परंपरेचा आद्य गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’: महानुभाव विचार, लोकशिक्षण आणि स्त्री-समानतेचे दर्शन

Authors

  • सोनाली सुनिल भागवत, डॉ. आर. टी. सोनटक्के

Keywords:

लीळाचरित्र, महिंभट्ट, चक्रधर स्वामी, महानुभाव संप्रदाय, भक्ती साहित्य परंपरा, मराठी गद्य, लोकशिक्षण, विवेकवाद, गुरु-शिष्य परंपरा व स्त्री-समानता

Abstract

महिंभट्ट लिखित लीळाचरित्र हा मराठी भक्ती साहित्य परंपरेतील अत्यंत मौलिक आणि ऐतिहासिक ग्रंथ आहे. १३ व्या शतकात कर्मकांड, जातिभेद आणि सामाजिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांनी समता, विवेक आणि भक्तीचा संदेश दिला. स्वामींच्या जीवनातील विविध घटना (लीळा) संकलित करून महिंभट्ट यांनी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध पद्धतीने रचला. त्यामुळे तो मराठीतील पहिला चरित्रग्रंथच नव्हे, तर मराठी गद्याचा पाया मानला जातो. ‘साधनीची लीळा’ गुरुभक्तीतील सहजता आणि देहधर्म स्वीकारण्याचा संदेश देते, तर महदंबेसारख्या विदुषी शिष्येचे चित्रण महानुभाव पंथातील स्त्री-समानतेची प्रगत भूमिका स्पष्ट करते. लोकभाषेतून अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि समाजपरिवर्तन साध्य करणारा हा ग्रंथ आजही प्रेरणादायी आहे.

References

१. तुळपुळे, शं. गो., मराठी वाङ्मयाचा इतिहास (खंड १), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७१, पृ. क्र. ११०-१२५.

२. कोलते, वि. भि., महानुभाव संशोधन, अरुण प्रकाशन, नागपूर, १९७५, पृ. क्र. ८०.

३. नॅने, व. बा., लीळाचरित्र (एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध), विदर्भ साहित्य संघ, नागपूर, १९६४, पृ. क्र. ४५-५०.

४. कोलते डॉ. वि. भि. (संपा.), लीळाचरित्र (म्हाइंभट संकलित), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, सप्टेंबर १९७८, पृ. क्र. ८०

५. तत्रैव, पृ. क्र. ८२

६. तत्रैव, पृ. क्र. ९६

७. तत्रैव, पृ. क्र. १०२

८. https://oldisrj.lbp.world/UploadedBData/1152.pdf

Review of Research Journal, Indian Streams Research Journal ISSN:-2230-7850 (कुलकर्णी नीलिमा, लीळाचरित्र एक परीक्षण)

Downloads

Published

24-12-2025

How to Cite

सोनाली सुनिल भागवत, डॉ. आर. टी. सोनटक्के. (2025). मराठी भक्ती परंपरेचा आद्य गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’: महानुभाव विचार, लोकशिक्षण आणि स्त्री-समानतेचे दर्शन. Kavya Setu, 1(12), 102–109. Retrieved from https://kavyasetu.com/index.php/j/article/view/139

Issue

Section

Original Research Articles

Similar Articles

<< < 1 2 3 > >> 

You may also start an advanced similarity search for this article.